मतदार नोंदणीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवसांपुर्वी मतदार नोंदणी करता येईल.
म्हणजे 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जातील.
संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात मतदार नोंदणीबाबतचे अर्ज उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात अर्ज भरून जमा करावयाचे आहे.
तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
Voter helpline App - मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासा. या ॲपद्वारे नवीन मतदार नोंदणी करता येईल.
KYC या अॅप उमेदवारांबाबत माहिती उपलब्ध होऊ शकेल
Cvigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे 100 मिनिटांत निराकरण केले जाते.
मतदार हेल्पलाईन क्रमांक- 1950 वर तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल.