ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्या स्वभाव आणि वागणुकीचे संकेत देते.
विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांमध्ये गर्व किंवा अभिमान असण्याची शक्यता अधिक असते.
1, 10, 19 आणि 28 या तारखांना जन्मलेले लोक अंकशास्त्रातील क्रमांक 1 शी संबंधित असतात.
त्यांच्या कुंडलीत सूर्याचा प्रभाव प्रामुख्याने दिसतो, ज्यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळतो.
या लोकांना स्वावलंबी असणे आवडते आणि ते इतरांवर अवलंबून राहणे पसंत करत नाहीत.
हे लोक नेहमीच एखाद्या नेत्यासारखे वागतात. यांच्याकडे विचार सरळ आणि स्पष्टपणे मांडण्याचा विश्वास असतो.
त्यांना कायमच पुढे राहायचं असतं आणि ते त्यांच्या विचारांवर ठाम असतात.
इतरांच्या मतांना कमी महत्त्व देऊन ते स्वतःचे निर्णय घेतात आणि मागे पडणे पसंत करत नाहीत. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)