मुंबई कशी करणार नौका पार?
आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामातील क्वॉलिफायरचा दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात खेळवला जाणार आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना होणार आहे.
आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे.
मात्र, क्वालिफायर 2 चे आकडे पाहून मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची भंबेरी उडालीये.
मागील 7 सीझनमध्ये प्लेऑफमध्ये नंबर 3 किंवा नंबर 4 वर राहिलेला संघ फक्त 2 वेळा फायनलमध्ये पोहोचला आहे.
याचाच अर्थ क्रमांक दोन आणि क्रमांक 1 वर पाहिलेल्या टीम फायनलमध्ये भिडण्याची शक्यता जास्त असल्याचं दिसून आलंय.
मुंबई संघाचं वारं फिरलं की, मुंबई कसाही गेम फिरवते, हे सर्वांना माहितीये. गुजरातविरुद्ध मुंबईचं पारडं जड राहिलंय.
गुजरात विरुद्ध मुंबई या हेड टू हेडमध्ये मुंबई 2-1 ने पुढे आहे. त्यामुळे आता मुंबई आपली नौका चेन्नईच्या किनाऱ्यावर लावणार का? असा सवाल विचारला जातोय