आयपीएल 2024 मध्ये सर्वात कमी सामन्यात 1000 षटकार लागण्याचा महाविक्रम झाला आहे. 8 मे रोजी लखनऊ वि. हैदराबाद सामन्यात एक हजार षटकरांचा विक्रम पूर्ण झाला.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केवळ 13079 चेंडूत 1000 षटकार लागले आहे. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील हा विक्रम आहे.
याआधी आयपीएल 2023 मध्ये 124 तर 2022 मध्ये 1062 षटकारांचा विक्रम होता.
आयपीएल 2023 मध्ये 1000 षटकार पूर्ण होण्यासाठी 15390 चेंडू खेळले गेले होते.
तर आयपीएल 2022 मध्ये 1000 षटकारांचा टप्पा पूर्ण होण्यासाठी 16269 चेंडू खेळले गेले होते.
8 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यात लखनऊच्या कृणाल पांड्याने हजारवा षटकार लगावला.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांमध्ये हैदराबादचा अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 12 सामन्यात 35 षटकार लगावलेत.