आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. त्यापूर्वी 31 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करावी लागणार आहे.
आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला मेगा ऑक्शनपूर्वी त्यांचे 6 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. यात 5 कॅप खेळाडू तर एका अनकॅप खेळाडूचा समावेश असेल.
2018 च्या ऑक्शनमध्ये लागू करण्यात आलेला RTM कार्ड (राइट टू मॅच) नियम हा यंदाच्या मेगा ऑक्शनसाठी सुद्धा लागू असेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध फ्रेंचायझींपैकी एक आहे.
आरसीबीचा फॅन बेस सुद्धा मोठा असून IPL 2025 पूर्वी RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? याची चर्चा फॅन्समध्ये सुरु आहे.
सध्या पीटीआयच्या हवाल्याने सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल होत असून यात आरसीबी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याची यादी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेल्या यादीनुसार आरसीबी मेगा ऑक्शनपूर्वी विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि मोहम्मद सिराज या तिघांना रिटेन करेल. मात्र अद्याप आरसीबीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही