इंडोनेशियाने Apple च्या iPhone 16 वर बंदी घातली आहे.
इंडोनेशियामधील उद्योगमंत्री आगुस गुमिवांग कार्तासस्मिता यांनी ही घोषणा केली आहे.
परदेशातून हा फोन खरेदी करु नका, असा इशारा त्यांनी ग्राहकांना दिला आहे.
ते म्हणाले की, iPhone 16 इंडोनेशियामध्ये काम करत असेल तर ते बेकायदेशीर आहे.
Apple ने गुंतवणुकीचे आश्वासन पूर्ण न करणे हा या बंदीचे कारण आहे.
Apple ने 1.71 ट्रिलियन रुपयांपैकी केवळ 1.48 ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे iPhone 16 ला परवानगी नाहीये.