उन्हाचा तडाखा अधिक त्रासदायक ठरत असतानाच अनेकजण AC चा पर्याय निवडतात. बाहेर तापमान कितीही असो, घरात किंवा कारमध्ये, AC सुरु केला की विषयच संपला.
घरातल्या एसीचं ठीक, पण कारमधील AC चा योग्य स्पीड काय? तुम्हाला माहितीये? कारच्या एसीचं मॅकेनिजम इंजिनशी जोडलेलं असतं. ज्यामुळं याचा थेट मायलेजवर परिणाम होतो.
एसी सुरु करताच कारच्या इंजिनवर ताण येतो. एसीचा पंखा कारच्या बॅटरीशी, म्हणजेच इलेक्ट्रीकल सिस्टीमशी जोडलेला असतो.
याच प्रणालीमुळे एसीची हवा कारच्या केबिनपर्यंत पोहोचते. एसीच्या पंख्याला बॅटरीकडूनच उर्जेचा पुरवठा केला जातो.
थोडक्यात एसीचा Speed कमीजास्त केल्यास कारच्या इंजिनवर किंवा मायलेजवर परिणाम होतो.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे एसी 1 च्या Speed वर चालवा किंवा 4 वर, यामुळं एकसारखच इंधन वापरात येणार हे स्पष्ट.