पृथ्वीच्या दिशेनं 18 ऑक्टोबर रोजी साधारण 710 फूट अर्थात एखाद्या स्टेडियमइतका मोठा लघुग्रह येत असून, 2024 RV50 असं या लघुग्रहाचं नाव.
पृथ्वीपासून हा लघुग्रह 4.6 मिलियन मैल इतक्या प्रचंड अंतरावरून जाणार आहे. ज्यामुळं त्याचे पृथ्वीवर थेट आणि गंभीर परिणाम होणार नाहीत असं नासानं स्पष्ट केलं आहे.
आपल्या सूर्यमालेत असे अनेक लघुग्रह असून, त्यांचा संचार अनेकदा पृथ्वीसाठी धोक्याचा ठरू शकतो. ज्यामुळं अंतराळ संशोधन संस्था सतर्कतेचा इशारा देतात.
साधारण 4.6 बिलियन वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती होताना राहिलेले हे खंड म्हणजेच लघुग्रह.
एखाद्या ग्रहाप्रमाणं या लघुग्रहांमध्ये वातावरण नसल्यामुळं त्याचा आकार आणि गुणधर्म वेगळे असतात. कैक लघुग्रह त्यांच्या उत्पत्तीपासून आकारत तसूभरही बदललेले नाहीत.
नासाकडून सातत्यानं अवकाशातील लघुग्रहांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. यामुळं पृथ्वीचा धोका पोहोचवण्याघ्या घटकांची माहितीसुद्धा मिळत राहते.