शहरं पाण्याखाली जाण्यामागे अनेक कारणं आहेत. कुठे भूकंप, त्सुनामी तर कुठे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ अशी कारणं सांगितली जातात.
पाण्याखाली बुडालेल्या शहरांमध्ये सगळ्यात पहिलं नाव घेतलं जातं ते व्दारका नगरीचं. भगवान कृष्णांची द्वारका नगरी प्राचीन भारतातील प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे. असं मानलं जातं की, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यानं द्वारका नगरी पाण्याखाली गेली.
चीनची लायन सिटीही द्वारका नगरी सारखी पाण्यात बुडाली. हा चीनच्या इतिहासाचा 600 वर्ष जुना पुरावा आहे. लायन सिटी खूप सुंदर होती असं मानलं जातं. हे शहर समुद्राच्या 85 ते 131 फूट खाली आजही आहे.
यूरोपच्या विकसित शहरांपैकी एक पोर्ट रॉयल शहर आहे. 1962 मध्ये भूकंप आणि त्यासोबत आलेल्या त्सुनामीने हे शहर पाण्याखाली गेले. यात 2000 लोकांचा मृत्यू झाला.
या शहरांच्या यादीतील चौथे शहर आहे क्लियोपेट्रा. हे शहर मिस्रमधील असून त्याची निर्मिती अलेक्झांडरने केली होती.
पावलोपेट्री हे ग्रीकमधील शहर आहे. असं म्हटलं जातं की हे शहर भूकंपामुळे पाण्यात बुडाले होते.