Ranveer Allahbadia चा गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? पालकांवरील वाईट कमेंटमुळे होतोय ट्रोल
करोडपती युट्यूबर रणवीर इलाहाबादिया त्याच्या पॉडकास्टमुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात. त्याचा शोमध्ये बरेच पाहुणे येत असतात.
या कार्यक्रमात तो इतरांच्या वैयक्तिक आयुष्याबदद्ल बोलतो. पण क्वचितच त्याचा वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा होते. त्याची प्रेयसी कोण आहे हे माहित नव्हतं.
पण काही दिवसांपूर्वी त्याचा गर्लफ्रेंडबद्दल बातम्या झळकल्या. टीव्ही अभिनेत्री निक्की शर्माला तो डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्यात. दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं.
तो काही दिवसांपूर्वी निक्की शर्मासोबत सुट्टीवर गोव्याला गेला होता. तिथे तो आणि त्याची मैत्रीणही पाण्यात बुडाले होते पण त्यांना वाचवण्यात आलं.
पण आता असं मानलं जातं की, दोघांचेही ब्रेकअप झालं आहे. सोशल मीडियावर निक्कीने आश्चर्यकारक पोस्ट शेअर केली आहे.
यासोबतच निक्की आणि रणवीरने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. ज्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं अशी चर्चा होतंय.
सध्या रणवीर सोशल मीडियावर खूप ट्रोल होतोय. त्याने समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोवर आक्षेपार्ह वक्तव्य केलंय.
त्यात गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप यामागे कारण काय आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय.
रणवीरला होणाऱ्या ट्रोलिंगमुळे हे ब्रेकअप झालं का असा प्रश्न विचारला जातोय.