शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारे कोलेजन हे एक प्रोटीन असून शरीरात मोठ्या प्रमाणात आढळते.
शरीरात कोलेजनची कमतरता ही गंभीर समस्या ठरु शकते. जाणून घेऊया, कोलेजनच्या कमतरतेची कारणे आणि त्याची लक्षणे.
हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे हे साहजिक असते. मात्र, अचानक त्वचा कोरडी पडून निस्तेज होत असेल तर शरीरात कोलेजनचे प्रमाण कमी झालं असण्याची शक्यता असते.
शरीरातील कोलेजनच्या कमतरतेमुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचेची लवचिकता कमी होते.
बऱ्याच कारणांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. शरीरात कोलेजनच्या कमतरतेमुळेही चेहऱ्यावर होतात. त्यांच्या खुणा लवकर भरल्या जात नाहीत.
डोळ्यांखाली खड्डे तयार होणे तसेच डोळ्यांभोवती काळेपणा ही शरीरातील कोलेजनच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.
कोलेजनच्या कमतरतेमुळे नखे कमजोर होतात आणि केससुद्धा गळतात.
वाढत्या वयासोबत शरीरातील कोलेजनची पातळी कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, धुम्रपान, अल्कोहोलचे सेवन, साखरेचे अधिक सेवन, संतुलित आहार न घेणे यासारख्या कारणांमुळे शरीरातील कोलेजनचे प्रमाण कमी होते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)