अभिनेत्री शोभिता धुलिपाला आता अक्किनेनी कुटुंबाची सून आहे. लग्नानंतरचा पहिला सण तिने खूप आनंदात साजरा केला.
अभिनेत्रीने लाल रंगाची साडी नेसली होती आणि कपाळावर कुंकूही लावले होते. शोभितावर हा पारंपारिक लूक शोभत होता.
तिने अंगणात सुरेख रांगोळी काढली होती. त्यासोबतच सगळ्यांना पोंगल आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
एवढेच नाही तर शोभिताने यानिमित्त शिरा बनवला आणि त्याचे फोटोदेखील शेअर केले.
या सगळ्यांपैकी चाहत्यांनी नागाचैतन्य आणि शोभिताच्या एका फोटोला खूप पसंती दिली. या फोटोला तिने हार्टची ईमोजी लावली आहे.
या जोडप्याचा हा पहिला सण असून ते 4 डिसेंबरला लग्न बंधनात अडकले होते.
लग्नापूर्वी दोघे एकूण दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
लग्नानंतर नेहमी दोघे त्यांच्या आनंदी क्षणांचे फोटो शेअर करत असतात.