वडा, भजी, फ्राईज, चिकन विंग्स या आणि अशा अनेक तळलेल्या पदार्थांवर ताव मारण्याची अनेकांचीच आवड.
तळलेले पदार्थ आले की आमची भूक थांबवणं निव्वळ अशक्य असंच अनेक मंडळी म्हणतात. पण, मुळात हे तळलेले पदार्थ प्रत्येक वेळी इतके चवदार का असतात?
तळलेले पदार्थ इंद्रियांना उत्तेरित करतात. यामध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेटचं प्रमाणही अधिक असतं, ज्यामुळं हे पदार्थ खमंग आणि चवीष्ट वाटतात.
तळलेले पदार्थ आरोग्यास मात्र हानिकारक ठरतात. दर दिवशी तळलेले अन्नपदार्थ खाल्ल्यानं आरोग्यावर विपरित परिणाम होतात.
तळलेल्या पदार्थांमधील फॅट आणि कॅलरीमुळं स्थुलता, कोलेस्ट्रॉल यांसारख्या शारीरिक व्याधी बळावतात.
परिणामी तळलेले पदार्थ कितीही खमंग आणि चवदार दिसत असले तरीही ते आरोग्यासाठी फायद्याचे नाहीत, ही बाब लक्षात घेण्याजोगी. (वरील माहिती सामान्य संदर्भांआधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)