हिवाळ्यातील 'हे' पदार्थ सुधारतील तुमचा मूड!

तेजश्री गायकवाड
Jan 14,2025


हिवाळ्याच्या ऋतूमुळे अनेक लोकांचा मूड बदलू शकतो आणि थकवा येऊ शकतो. कमी सूर्यप्रकाश आणि थंड तापमानाचा आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो.


पण तुम्हाला माहीतआहे का की काही खास खाद्यपदार्थांच्या मदतीने तुम्ही हिवाळ्यातही तुमचा मूड सुधारू शकता.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनॉल असतात, जे मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढवतात. यामुळे तुम्हाला छान वाटते.

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि मूड सुधारण्यास मदत करतात.

आले

आल्यामध्ये इंफ्लेमेटरी-विरोधी गुणधर्म असतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात.

केळी

केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 असते, जे सेरोटोनिन स्राव करण्यास मदत करते. ज्यामुळे मड सुधारतो.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story