रोज खा फक्त एक केळी, मिळतील अगणित फायदे

तेजश्री गायकवाड
Oct 24,2024


केळी हे फळ सर्व ऋतूमध्ये सहज उपलब्ध असते.रोज केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

किडनीचे आरोग्य सुधारणे

केळी खाल्ल्याने किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते रोज खाल्ल्याने किडनीचे आरोग्य सुधारते.

वजन नियंत्रणात राहण्यास मदत

यात भरपूर फायबर आणि नैसर्गिक साखर असते, जे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि जास्त खाण्यापासून आपण वाचतो. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

त्वचेसाठीही फायदेशीर

केळी आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. केळी मध्ये उपस्थित मँगनीज कोलेजन उत्पादनात मदत करते, ज्यामुळे आपली त्वचा तरुण आणि निरोगी दिसते.

पोटात पीएच पातळी राखणे

केळीमध्ये नैसर्गिक अँटासिड गुणधर्म असतात, जे ऍसिड रिफ्लक्स कमी करण्यास आणि पोटातील पीएच पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story