एसबीआयमध्ये 5 ते 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर मिळतो.
तीन ते पाच वर्षे या कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 6.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के व्याजदर मिळतो.
एसबीआयमध्ये तीन ते पाच वर्षाच्या कालावधीसाठी सर्वाधिक व्याजदर ऑफर करते.
2 ते 3 वर्षाच्या कमी अवधीच्या एफडीवर ग्राहकांना 7 टक्के आणि सिनियर सिटीझन्सना 7.50 टक्के व्याजदर मिळतो.
तुम्ही SBI च्या एफडीवर 7 वर्षासाठी 7 लाख रुपये गुंतवत असाल तर मॅच्योरिटीवर तुम्हाला 10 लाख 99 हजार 294 रुपये मिळतील.
10 लाख 99 हजार 294 रुपयातील 3 लाख 99 हजार 294 रुपये व्याजाची कमाई असेल.
तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर 11 लाख 77 हजार 583 रुपये मिळतील.
गुंतवणूकीची रक्कम 7 लाख रुपये आणि व्याजाची रक्कम 4 लाख 77 हजार 583 रुपये असेल.