ही भजी थंडी, पावसाळा या ऋतूंमध्ये खाण्याची मडा काही औरच. त्यातही भजी गरम असेल तर हा आनंद दुप्पट.
भजीसारखा चमचमीत पदार्थ गरम असतानाच खाणं उत्तम, असं म्हटलं जातं. कारण, घरी तयार केलेली कुरकुरीत भजी अनेकदा थंड होताच मऊ पडते.
यासाठीची टीप म्हणजे, भजीसाठी कांदा, बटाटा, पालक किंवा अगदी कोबी थेट बेसनामध्ये बुडवू नका. उलटपक्षी या भाज्यांवरच कोरडं बेसन पेरून त्यावर मसाले मिसळा.
आवश्यकतेनुसार पाणी टाकून साधारण बेसन भाजीवर चिकटेल असं मिश्रण तयार करा. भजी कुरकुरीत करण्यासाठी बेसनसोबत थोडं तांदळाचं पीठही वापरा. ते नसल्यास आरारुट किंवा गव्हाचं पीठही तुम्ही वापरू शकता.
भजी तळत असतानाच कढईमध्ये कधीच दाटीवाटीत तळू नका. अशानं तेलाचं तापमान सतत बदलतं आणि भजी कुरकुरीत होत नाही.
भजी एकाच वेळी पूर्ण तळू नका. पहिल्या टप्प्यात भजी अर्धी कच्ची राहील इतकी तळा आणि नंतर ती जेव्हा खायचीय तेव्हा तळून घ्या. (छाया सौजन्य- फ्रीपिक)