कोरडे आणि निर्जीव केसांना चमकदार बनवायचे असेल तर चहाच्या पानाचे पाणी वापरा.
चहाच्या पानाने केस धुतल्याने अनेक समस्या दूर होतात.
केसांसाठी चहाच्या पानांचे बनवण्यासाठी एका पातेल्यात १ लिटर पाणी घ्या. त्यात सुमारे 2 चमचे चहाची पाने टाका आणि उकळवा.
पाण्याला चांगला रंग आला की गॅस बंद करा आणि पाणी थंड होऊ द्यात.
पाणी थंड झाल्यावर याने तुम्ही तुमचे केस धुवू शकता. आपण ते केसांवर स्प्रे करू शकता आणि 40 मिनिटे सोडू शकता.
चहाच्या पानाच्या पाण्यात मिसळून तुम्ही कोरफडीचे जेल वापरू शकता आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)