मंदिरात जाणारी रांग पुस्तकालयात जाताना दिसेल त्या दिवसापासून भारताला महाशक्ती होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
चुकीला चूक म्हणण्याची क्षमता नसेल तर तुमची प्रतिभा व्यर्थ आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा.
ज्ञानाचा विकास हेच मनुष्याचे अंतिम सत्य असायला हवे.
यश कधी पक्कं नसतं आणि अपयश कधी अंतिम नसतं.
तुमचा विजय इतिहास बनत नाही तोपर्यंत प्रयत्न सुरु ठेवा.
हिसकावून घेतलेले अधिकार भिकेत मिळत नाहीत. ते वसूल करावे लागतात.
बुद्धीचा विकास मानवाच्या अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असायला हवे.
धर्म मनुष्यासाठी आहे. मनुष्य धर्मासाठी नाही.
मला तो धर्म आवडतो जो स्वतंत्रता, समानता आणि सलोखा शिकवतो.