ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज (25 मे 2023) बारावीचा निकाल जाहीर होतील. 10 वीचे निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होतील. मात्र, निकालाची तारीख आणि वेळ याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्र HSC, SSC परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे.
महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2023 ही 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत झाली होती, तर बारावीची म्हणजेच एचएससी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीमध्ये पार पडली.
महाराष्ट्र बोर्ड एसएससी परीक्षा 2023 मध्ये 15,77,256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यामध्ये 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुलींनी परीक्षा दिली. बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे 14 लाख लोकांनी नोंदणी केली होती. त्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने अधिकृत वेबसाइट - mahresult.nic.in वर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र SSC निकाल 2023 किंवा महाराष्ट्र 10 वी बोर्डाचे निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे.