हिमालयाच्या हिमशिखरांमधून अनेक नद्यांचा उगम होतो, या अशा नद्या आहेत ज्या कायमच प्रवाहित होत असतात. पण, प्रश्न असा की हिमालयावर इतका बर्फ येतो तरी कुठून?
दक्षिण पश्चिमी मान्सून वारे बाष्पयुक्त वारे पूर्व हिमालय क्षेत्रामध्ये आणतात. जिथं, उतारावरून वरच्या दिशेनं येणारं बाष्प थंड होत घन रुप घेत त्याच स्वरुपात हिमवादळ किंवा बर्फवृष्टीच्या रुपानं पर्वतांवर जमा होतं.
4000 मीटरहून अधिक उंचीवर प्रचंड थंडी असते ज्यामुळं इथं कडाक्याची थंडी पडत हिमवृष्टी होते.
हिमालयाच्या पर्वतरांगांच्या उंचीचा आढावा घ्यायचा झाल्यास त्या 300 मीटरपासून अगदी एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत असतात.
परिणामी सततचा हिमवर्षाव आणि किमान तापमानामुळं इथं वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात बर्फ साचला आहे.
हिमालयाच्या पर्वतशिखरांवर वर्षभर बर्फवृष्टी होत असते. अतीव उंचीच्या शिखरावर होणाऱ्या बर्फवृष्टीचं प्रमाण अधिक असून, इथं बर्फाचा प्रचंड मोठा साठा आहे.