सावकारी जाचाला कंटाळून प्रसिद्ध उद्योजकाची नगरमध्ये आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून प्रसिद्ध उद्योजकाची नगरमध्ये आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून नगरमधील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब पवार यांनी बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. मंदीच्या काळात नगर जिल्ह्यातील धनाढ्य उद्योजकाने अशा प्रकारचे कृत्य केल्याने हळहळ व्यक्त होते आहे.

सरकारचा दणका, अशा अधिकाऱ्यांना नाही देणार पासपोर्ट

सरकारचा दणका, अशा अधिकाऱ्यांना नाही देणार पासपोर्ट

भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या सरकारी अधिका-यांना यापुढे पासपोर्ट मिळणे कठीण होणार आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालयानं जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार यापुढे भ्रष्टाचाराच्या आरोपात निलंबित असणाऱ्या किंवा ज्यांविरोधात खटले सुरू आहेत अशा अधिकाऱ्यांना पासपोर्टचा अर्ज नाकारण्याचा अधिकार मंत्रालयानं स्वतःकडे राखून ठेवला आहे.

...म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रवरचा धोका टळला

...म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रवरचा धोका टळला

चीनचं अवकाश स्थानक टायोगाँग दक्षिण प्रशांत समुद्रात कोसळलं. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रवरचा धोका टळला आहे. 8 टन वजनाचं हे अवकाश स्थानक मुंबई किंवा महाराष्ट्रात कोसळण्याची भीती व्यक्त होतं होती. 

आज देशभरातील दलित संघटनांची बंदची हाक

आज देशभरातील दलित संघटनांची बंदची हाक

अट्रोसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं झालेल्या बदलाला विरोध करण्यासाठी आज देशभरातील दलित संघटनांची बंदची हाक

सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यानी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.

संघाला सगळ्याना सामावून घ्यायचं आहे - मोहन भागवत

संघाला सगळ्याना सामावून घ्यायचं आहे - मोहन भागवत

मुक्तची भाषा राजकारणात चालते, संघात नाही, संघाला सगळ्यांना सामावून घ्यायचंय, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

शरद पवारांचे चरणस्पर्श केल्याने एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत

शरद पवारांचे चरणस्पर्श केल्याने एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून पक्षात घुसमट होत असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात जैन हिल्सवर झालेल्या एका जाहीर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतले.

धक्कादायक! कबड्डी खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

धक्कादायक! कबड्डी खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

पुण्यातल्या शिरूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेच्या मैदानावर कबड्डी खेळत असताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. गौरव अमोल वेताळ असं या खेळाडुचं नाव होतं. 

जम्मू काश्मीरमध्ये ८ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये ८ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये ८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. अनंतनाग आणि शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

पुणे वेधशाळेचं ९१ व्या वर्षात पदार्पण

पुणे वेधशाळेचं ९१ व्या वर्षात पदार्पण

पुणे वेधशाळेचे ९१ व्या वर्षात पदार्पण होत आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणा-या भारतीय हवामानशास्त्र विभागाचे कार्यालय शिमला इथून पुण्याला स्थलांतर झाले. त्याला नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत. वेधशाळेच्या कार्यालयामुळे शिवाजीनगर इथल्या या चौकाला शिमला ऑफिस चौक असंही संबोधले जाते.