अजयने हनीमूनमध्ये धरला घरी जाण्याचा हट्ट, काजोलला म्हणाला...

नक्की काय आहे प्रकरण?   

Updated: Jan 23, 2022, 10:22 AM IST
अजयने हनीमूनमध्ये धरला घरी जाण्याचा हट्ट, काजोलला म्हणाला... title=

मुंबई : अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल उत्तम कलाकार तर आहेतच, पण त्यासोबतचं ते प्रसिद्ध कपल म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या लग्नाला आज 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या नात्याचे असे अनेक किस्से आहेत, जे आज  देखील चर्चेत असतात. त्यामधील एक त्यांच्या हनीमूनचा किस्सा. हनीमूनबद्दल खुद्द काजोलने एक मोठा खुलासा केला. 

इंडिया टुडेमध्ये रिपोर्टनुसार, काजोलने अजय देवगणसमोर एक अट ठेवली होती की, लग्नानंतर दोघेही दोन महिन्यांसाठी वर्ल्ड टूरवर जातील, पण हनीमूनच्या मधल्या काळात अजय देवगणने घरी जाण्यासाठी काजोलकडे हट्ट धरला. 

मुलाखतीदरम्यान काजोलने सांगितलं की, 'लग्नानंतर आम्ही हनिमूनला निघालो. आम्ही ऑस्ट्रेलियाहून लॉस एंजेलिस आणि नंतर वेगासला गेलो. यामध्ये एक महिन्याहून अधिक काळ लोटला होता. त्यांमुळे मी आनंदी होते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काजोल पुढे म्हणाली, 'आम्ही ग्रीसमध्ये होतो आणि जवळपास 40 दिवस झाले होते. एके दिवशी सकाळी अजय उठला आणि मला सांगू लागला की त्याला खूप ताप आणि डोकेदुखी आहे.'

'मी त्याचासाठी काही औषधं देखील घेवून आली. पण तो सतत बरं बाटत नाही असं बोलत होता. त्यानंतर मी विचारलं, आता मी काय करू? तो मला म्हणाला मला घरी जायचं आहे, मी थकलो.' 

या एका कारणामुळे काजोल आणि अजयला हनीमून सोडून परत मुंबईत यावं लागलं. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर 1994 साला पासून ते एकमेकांना डेट करत होते. 

जवळपास 5 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 1999 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांची मुलगी न्यासा अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर चर्चेत असते.