'बडे मिया छोटे मिया' सिनेमासाठी अक्षय आणि टायगरने घेतलं इतकं मानधन?

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मिया छोटे मिया सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज आहे. येत्या 10 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार असून सिनेमातील कलाकार  त्यांना मिळालेल्या मानधनामुळे चर्चेत आहेत. 

Updated: Apr 3, 2024, 07:51 PM IST
'बडे मिया छोटे मिया' सिनेमासाठी अक्षय आणि टायगरने घेतलं इतकं मानधन? title=

मुंबई: बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा आगामी सिनेमा 10 एप्रिलला  चाहत्यांच्या भेटीस येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. या सिनेमात अक्षय आणि टायगर मुख्य भुमिकेत असणार आहेत. सिनेमाचं शूटींग पूर्ण होऊन आता हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे.  असं म्हटलं जातं की या सिनेमातील भूमिकेसाठी अक्षय कुमारने 75 कोटी रुपये मानधन घेतले. मात्र टायगर श्रॉफला  या सिनेमातील त्याच्या भुमिकेसाठी त्याला 20 कोटी रुपये मानधन आकारले. 

'बडे मिया छोटे मिया 'हा फुल ऑन अ‍ॅक्शन आणि कॉमेडी सिनेमा आहे.  ट्रेलरमध्ये दाखवल्या प्रमाणे या दोघंही आर्मी ऑफिसरची व्यक्तिरेखा साकारत आहे. अली अब्बासने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून अक्षय कुमारने त्याच्या सोशलमीडियावर या सिनेमाचा ट्रेलर शेयर केला होता. या सिनेमाचा ट्रेलर आल्यावर सिनेमाच्या नावावरुन हा 25 वर्षांपूर्वीचा  'बडे मिया छोटे मिया' चा दुसरा भाग आहे अशी चर्चा रंगत होती. मात्र नाव सिनेमाचं नाव सारखं असून या दोन्ही सिनेमांच्या कथानकांमध्ये खूप फरक आहे, असं सांगण्यात आलं. या सिनेमात टायगर आणि अक्षय व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा मुख्य भुमिकेत असून साऊथचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा पृथ्वीराज सुकुमारन हा व्हिलनच्या भुमिकेत असणार आहे. या सिनेमातील भुमिकेसाठी सोनाक्षीला 5 कोटी रुपये मानधन देण्यात आलं तर पृथ्वीराज सुकुमारनने त्याच्या खलनायक भुमिकेसाठी 6 कोटींचं मानधन घेतलं आहे. हा सिनेमा कॉमेडी आणि अ‍ॅक्शन बरोबरच सस्पेन्स थ्रिलर असणार आहे. 

या शिवाय मानुषी छिल्लर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. अक्षय सोबतचा तिचा हा दुसरा सिनेमा असून रोनित रॉय हा सहकलाकाराच्या भुमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी  मानुषी छिल्लर आणि रोनित रॉय यांनी 1 कोटींचे मानधन स्विकारले असल्याचं सांगितलं आहे. 10 एप्रिलला रिली़ज होणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकेल का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अली अब्बास जाफरने या आधी टायगर जिंदा है, एक था टायगर, सुलतान, गुंडे या सिनेमांचं दिग्दर्शन केलं असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. अली अब्बास जाफर हा दिग्दर्शक असण्याबरोबरच लेखक आणि निर्माता ही आहे.