मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' सिझन 10 मध्ये 1 करोड रुपये जिंकणारी बिनीता जैन सध्या खूप चर्चेत आहे. बिनीताचा खडतर प्रवास आणि तिने जिंकलेले 1 करोड रुपये हे अमिताभ बच्चन यांना देखील आनंद देणार आहेत. बिनीता जैन यांना 7 करोड रुपयांच्या प्रश्नाचं देखील उत्तर येत होतं. पण ती त्या उत्तराबाबत साशंक असल्यामुळे तिने हा गेम तेथेच थांबवला. बिनीताच्या नंतर बुधवारी महाराष्ट्रातील येलूर गावातील शरद माळी हॉट सीटवर बसला होता. शरदचे वडिल शेतकरी असून त्याची आई ही गृहिणी आहे. शरद यांची गोष्ट खूपच भावूक आणि प्रेरणादायी आहे.
शरद यांच्यावर तयार करण्यात आलेल्या व्हिडिओ असं दाखवण्यात आलं की, शरद यांच्या आईला शिक्षणाची खूप आवड होती पण परिस्थितीमुळे शिकता आलं नाही. यामुळे त्यांनी मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. शरदसोबत त्यांची आई केबीसीच्या सेटवर उपस्थित होती.
यानंतर अमिताभ बच्चन यांनी शरदच्या आईशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, मला हिंदी येत नाही पण मला तुमच्याशी बोलायचं. पुढे त्या म्हणाल्या की, मी खूप छोटी होती तेव्हा माझ्या वडिलांच निधन झालं. त्यानंतर माझ्या आईला मी अडचण वाटू लागले आणि तिने माझं लवकर लग्न केलं. यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं नाही.
शरदच्या आईने पुढे सांगितलं की, मी माझ्या दोन्ही मुलींना पीएचडीपर्यंत शिकवलं आहे. आणि आता शरद आपल्या ज्ञानाच्या आधारावर हॉट सीटपर्यंत पोहोचला. शरद खूप आत्मविश्वासाने खेळत होता. शरदला बिग बींचे दोन सिनेमे 'मंजिल' 'दीवार' आवडतात. शरद यांची आतापर्यंत कुणीही गर्लफ्रेंड नाही. तेव्हा बिग बींनी शरदच्या आईला शरदचं लग्न करण्यास सांगितलं.
शरदला प्लेबॅक सिंगर व्हायचं आहे. त्याने हॉट सीटवर बसून मेरी सोणी मेरा तमन्ना झूठ नही है मेरा प्यार.... हे गाणं गायलं. घरी गाण्याला पुरक वातावरण नसल्यामुळे कधीच शिक्षण घेता आलं नाही. शरद केबीसीमध्ये 25 लाख रुपये जिंकला आहे. आणि आता तो यातून बिझनेस सुरू करणार असल्याचं सांगितलं.