मुंबई : अफगाणिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता जगाभरातून त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सेलिब्रिटींपासून ते सामान्यांपर्यंत प्रत्येकजण याबद्दल आपली प्रतिक्रिया आणि मत देत आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही अलीकडेच याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, स्वरा भास्करने जे लिहिले ते लोकांना आवडले नाही आणि ArrestSwaraBhasker हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला आहे.
एवढेच नाही तर स्वरा भास्करविरोधात यूपीमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील कल्पना श्रीवास्तव यांनी ई-तक्रार नोंदवल्यानंतर तिच्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली. सतत वादात राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा वादात सापडली आहे.
काय म्हणाली स्वरा भास्कर?
स्वरा भास्करवर एका ट्विटद्वारे तालिबानी दहशतवाद्यांची हिंदुत्वाशी तुलना केल्याचा आरोप आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'तालिबानकडून पसरवलेली दहशतीमुळे आम्ही भयभीत आणि हिंदुत्वाकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतीमुळे निश्चिंत होऊ शकत नाही. तालिबान्यांनी पसरवलेल्या दहशतीबद्दल आपण सहज देखील असू शकत नाही आणि मग हिंदुत्वाद्वारे पसरवल्या जाणाऱ्या दहशतीवर रागावू शकतो.
We can’t be okay with Hindutva terror & be all shocked & devastated at Taliban terror.. &
We can’t be chill with #Taliban terror; and then be all indignant about #Hindutva terror!
Our humanitarian & ethical values should not be based on identity of the oppressor or oppressed.— Swara Bhasker (@ReallySwara) August 16, 2021
लोकांनी केलं जोरदार ट्रोल
स्वरा भास्करने लिहिले, 'आमची मानवी आणि नैतिक मूल्ये अत्याचारी किंवा दबलेल्यांच्या ओळखीवर आधारित नसावीत.' अभिनेत्रीच्या या ट्विटमुळे तिला जोरदार ट्रोल करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर तिच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीमागे तिचे ट्विट हे देखील कारण आहे.
एका यूजरनं लिहिले - कृपया या ट्रेंडला समर्थन द्या आणि स्वरा भास्करला अटक करा.