मुंबई : OTT प्लॅटफॉर्मला कोरोनाच्या काळात चांगलंच महत्त्व आलं. याचा सर्वात मोठा फायदा त्या सेलिब्रिटींना होत आहे, ज्यांना बॉलीवूडमध्ये मोठ्या ऑफर्स नसल्यामुळे आपली प्रतिभा दाखवता आली नाही. याआधी लोकं चित्रपटगृहातच चित्रपट पाहत होते. पण आता त्यांना कुठेही चित्रपट पाहता येतोय.
अनेक जणांना आता OTT वर सिनेमा पाहण्याची सवय झाली आहे. त्यामुळे चित्रपटगृहात जाणे कमी झाले आहे. पण OTT प्लॅटफॉर्मवर बोल्ड सीन्सने अधिक लोकप्रियता मिळवली. जे सिनेमागृहात शक्य नव्हत्या.
ओटीटीमुळे अनेक अभिनेत्रींनी बोल्ड सीन देऊन प्रेक्षकांची मने जिंकली. अभिनेत्रींनी असे इंटिमेट सीन दिले की, चाहत्यांना ही धक्का बसला.
अभिनेत्री त्रिशा चौधरीने 'आश्रम' या वेब सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले होते, ज्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती आणि आजही त्यांच्या बोल्ड सीन्सचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.
अभिनेत्री अदिती पोहनकर देखील वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स देऊन रातोरात प्रसिद्ध झाली. याशिवाय अदितीने आश्रम वेब सीरिजमध्ये पम्मी पहेलवानची जबरदस्त भूमिका साकारली होती.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर वेब-सिरीजमध्ये रसिकाने पंकज त्रिपाठी आणि ज्येष्ठ अभिनेते कुलभूषण खरबंदा यांच्यासोबत अनेक बोल्ड सीन्स दिले होते. ज्यामुळे ती बरीच चर्चेत राहिली.