आपल्या सौंदर्यानं चाहत्यांची मनं जिंकून घेणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन बारावीला पडले होते इतके टक्के!

या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत साऊथचा सुपरस्टार विक्रम झळकणार आहे. 

Updated: Sep 29, 2022, 05:06 PM IST
 आपल्या सौंदर्यानं चाहत्यांची मनं जिंकून घेणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन बारावीला पडले होते इतके टक्के! title=

Aishwarya Rai Bachchan Education: आपल्या सौंदर्यानं चाहत्यांची मनं जिंकून घेणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन आज संपुर्ण जगात फेमस आहे. बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडपर्यंत ऐश्वर्यानं आपल्या मोहक अदांनी चाहत्यांनी घायाळ करून सोडलं आहे. मिस वर्ल्ड बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय लवकरच एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम त्यांचा पोनियन सेल्वन- 1 हा नवा कोरा पिरियड ड्रामा लवकरच चाहत्यांच्या भेटील येतो आहे. (bollywood actress aishwarya rai bachchan education she has scored 90 percent in 12th std)

या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत साऊथचा सुपरस्टार विक्रम झळकणार आहे. या चित्रपटतला ऐश्वर्याचा लुक सगळीकडेच पसंत केला आहे. ऐश्वर्यानं आत्तापर्यंत अनेक उत्तमोत्तम हिट चित्रपट दिले आहेत. पण तुम्हाला माहितीये का की ऐश्वर्या जेवढी चांगली अभिनेत्री आहे तेवढीच चांगली ती विद्यार्थीही हाेती. ऐश्वर्याला सुरुवातीपासूनच अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंगची आवड नव्हती. तिला अभ्यासात चांगली गती होती. परंतु 1994 मध्ये ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

ऐश्वर्या राय बच्चनचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. ऐश्वर्याच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. तिचे संपूर्ण शिक्षण मुंबईत झाले. ऐश्वर्याचं शालेय शिक्षण आर्य विद्या मंदिर हायस्कूलमधून झाले. नंतर तिनं जय हिंद महाविद्यालयातून शिक्षण पुर्ण केले. ऐश्वर्याला बारावीत 90% गुण मिळाले. ती शाळेत संगीताचे क्लासेसही घ्यायची त्याचसोबक तिनं एक भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे.

मॉडेलिंगची फारशी आवड नसलेल्या ऐश्वर्याला आर्किटेक्ट व्हायचे होते, परंतु नंतर अभ्यासासोबतच ऐश्वर्यानं मॉडेलिंगमध्येही भाग घ्यायला सुरूवात केली. बारावीनंतर ऐश्वर्या रायनं ग्रॅज्युएशनसाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला.पण मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी तिने तिचे शिक्षण मध्येच सोडले अशी माहिती समोर येते. ऐश्वर्या सांगते की तिच्या ग्रॅज्युएशन दरम्यान तिला 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटाची ऑफर आली होती.

ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये रोबोट, सरबजीत, जोश, जोधा अकबर आणि देवदास यांसारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे.