Evelyn Sharma Birthday: फक्त अभियनच नाही तर अनेक अभिनेत्रींना आपल्या मल्टिटास्किंग आणि इतर कौशल्यासाठीही ओळखल्या जातात. अशाच एका अभिनेत्रीची सध्या चर्चा सुरू झालेली आहे जिचा आज वाढदिवस आहे. 'ये जवानी हैं दिवानी' या चित्रपटात तिनं रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंडची भुमिका निभावली होती. तिच्या या छोटेखानी भुमिकेचेही प्रचंड प्रमाणात कौतुक झाले होते. तिच्या या भुमिकेची अनेकांना आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हा चित्रपटही तेव्हा प्रचंड गाजला होता. यावर्षी या तरूणाईच्या आवडत्या चित्रपटानं 10 वर्षे पुर्ण केली आहेत त्यामुळे या चित्रपटाचीही चांगलीच चर्चा रंगली होती. त्याचसोबत दीपिका पादूकोणसह या चित्रपटातील कलाकारांनी आपली पोस्टही शेअर केली होती. सोबतच संपुर्ण टीमनं एक गेट टू गेदरही केलं होतं.
इव्हलिन शर्माबद्दल बोलायचे झाले तर तिनं नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे त्याआधी तिला एक मुलगीही आहे. त्यामुळे तिच्या या गुडन्यूजबद्दलही फार चर्चा रंगली होती. आता यावेळी चर्चा आहे ती म्हणजे तिनं शिकेलल्या 8 भाषांची. तुम्हाला माहिती नसेल परंतु या अभिनेत्रीनं चक्क आठ भाषांचा अभ्यास केला आहे आणि त्यात ती पुर्णपणे मास्टर आहे. एवलिन शर्मा ही मुळातच जर्मनमधील राहणारी आहे. तिचा जन्म हा 12 जुलै 1986 रोजी झाला आहे. तिचे वडिल हे भारतीय तर तिची आई ही जर्मनीची आहे. फक्त 'ये जवानी हैं दिवानी'च नाही तर तिनं अनेक हिंदी आणि दाक्षिणात्त्य चित्रपटांतून महत्त्वाची भुमिका केली आहे त्यामुळे तिचीही फिल्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये चांगलीच चर्चा रंगते.
हेही वाचा - 'जवान' स्टाईलने शाहरूखचं आभार प्रदर्शन; कोणाला 'दा' कोणाला 'गुथी' म्हणतं व्यक्त केल्या भावना
एवलिन शर्मा या अभिनेत्रीला हिंदी, स्पॅनिश, थाई, टेगलॉग, फिलिपिनो, फ्रेंच आणि डच अशा भाषा येतात. तिनं याआधी आपल्या करिअरची सुरूवात ही मॉडेलिंगनं केली होती. त्यानंतर तिनं अनेक हिंदी चित्रपटातून कामं केली आहेत. 'यारियां', 'ये जवानी है दीवानी', 'मैं तेरा हीरो', 'कुछ-कुछ लोचा है', 'साहो'. 'किस्सेबाज', 'जब हैरी मेट सेजल', 'जैक & दिल' अशा चित्रपटांतून तिनं महत्त्वाच्या भुमिका केल्या आहेत. त्याचसोबत 'यारियां' या तेव्हा गाजलेल्या चित्रपटांतूनही तिनं काम केलं आहे. 'फ्रॉम सिडनी विथ लव्ह' या चित्रपटातून तिनं 2012 साली डेब्यू केला होता.