Mahatma Gandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची आज 153 वी जयंती आहे. भारतात आज महात्मा गांधी जयंती (Mahatma Gandhi Jayanti) साजरी करण्यात येत आहे. या विशेष प्रसंगी ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलंय. जगात हा विशेष दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यापासून विविध क्षेत्रातील लोकांकडून महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आदरांजली वाहण्यात येत आहे. बॉलिवूड (Bollywood) कलाकारांनीही महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांचे स्मरण केलंय.
गांधी जयंतीच्या निमित्ताने अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) त्याच्या 'लगे रहो मुन्ना भाई' (Lage Raho Munna Bhai) चित्रपटातील एक दृश्य शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये संजय दत्तला (Sanjay Dutt) सुरक्षा रक्षकाने कानाखाली मारली होती. हा संजय दत्तचा सुपरहिट चित्रपट होता, जो 2006 साली आला होता. संजय दत्त आणि सुनील दत्त यांच्या 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटाचा सिक्वेल होता. 'लगे रहो मुन्ना भाई' या चित्रपटालाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते.
संजय दत्तने शेअर केलेला 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटातील दृश्यामध्ये एक सुरक्षा रक्षक संजय दत्तला कानाखाली मारतो. यावर सर्किट (अर्शद वारसी) लगेच रागाने गार्डच्या दिशेने पुढे सरकतो. पण संजय दत्त त्याला थांबवतो. बापूंची शिकवण लक्षात ठेवून संजय दत्त म्हणतो की, जेव्हा कोणी एका गालावर मारतं तर दुसरा गाल त्याच्यासमोर न्यावा.
पण सुरक्षा रक्षकाने संजय दत्तच्या दुसऱ्या गालावरही चापट मारली. यानंतर संजय दत्त क्षणभर विचार करतो आणि नंतर सुरक्षा रक्षकाच्या गालावर जोरदार कानाखाली मारतो. त्यानंतर संजय दत्त सर्किटला समजावून सांगतो की, जेव्हा त्याने दुसऱ्या गालावर कानाखाली मारली तेव्हा बापूंनी काय करावे हे सांगितले नाही. या व्हिडीओमध्ये संजय दत्तवर मी (Me) आणि सुरक्षा रक्षकावर जीवन (Life) असं लिहिलेलं आहे.
दरम्यान, संजय दत्तची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लोक कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने बाबा तू अप्रतिम आहेस असे म्हटलं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी दिला आहे.