नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या ७८ व्या दिवसानंतरही हे प्रकरण सुटताना दिसत नाहीय. 'झी न्यूज'ने सुशांतला न्याय देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोहीम सुरु केलीय. यासाठी सोशल मीडियावर डिजीटल आंदोलन सुरुयं. रविवारी संध्याकाळी #IAMSushant वर दीड लाखाहून अधिक ट्वीट झाले होते. परिणामी देशात हे देशभरात ट्वीटवर टॉपला राहीले.
सीबीआयने सुशांतची बहीण मितू सिंगला नोटीस पाठवलंय. सीबीआय तिची बाजु रेकॉर्ड करेल.आज सकाळी ११ वाजता डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये ही कार्यवाही होईल. सुशांतची दुसरी बहीण नितू सिंहला देखील नोटीस पाठवण्यात आलीय.
सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज बाजू विचारात घेतली जातेय. सीबीआयची टीम आज एनसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटू शकते. सीबीआयचे अधिकारी रिया सोबत ड्रग्ज कनेक्शन संदर्भात चौकशी करत आहेत. यामध्ये बॉलिवुडमधील अनेक मोठी नाव आहेत ज्यांच्यासोबत रिया पार्टी करत असे.
अमली पदार्थांसाठी थेट संपर्क करणे रिया टाळत असे. यासाठी नीरज, दीपेश, सॅम्युअल मिरांडा आणि केशव यांना सांगितलं जायचं.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातले अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ तर पोस्टमॉर्टम रिपोर्टवरच प्रश्न उपस्थित करत आहेत. दुसरीकडे साक्षीदारांची विधानं देखील परस्पर विरोधी आहेत. तसंच रिया चक्रवर्तीही सीबीआयच्या अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देऊ शकली नाही, म्हणून सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय आता पॉलीग्राफी टेस्टची तयारी करत आहे.
८ जूनला रियाने सुशांतशी ब्रेकअप केलं होतं का? ८ जून ते १४ जूनदरम्यान सुशांतच्या घरी काय झालं? सुशांतच्या मृत्यूचं कारण ८ जूनची तारीख ठरली का? असं वाटतंय की जणू ८ जूनमध्येच लपलेत सुशांतच्या मृत्यूचे खरे पुरावे. सीबीआय पथक सुशांतच्या मृत्यूचं सत्य शोधण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहेत, मात्र अजूनही सत्य लपलेलच आहे.
सॅम्युअल मिरांडा, नीरज, केशव, सिद्धार्थ पिठानी, रजत मेवाती आणि रिया चक्रवर्तीवर प्रश्नांची सरबत्ती सुरूच आहे. पण ८ जूनचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. सूत्रांनुसार सीबीआयच्या प्रश्नांनी रिया चक्रवर्ती गांगरुन गेली आहे. म्हणूनच ८ जून ते १४ जूनदरम्यानच्या घटना उलगडणं सीबीआयसाठी अत्यावश्यक झालं आहे.
चौकशीमध्ये एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल, तर त्याचा रक्तदाब वाढतो आणि ते लगेच लक्षात येतं, असं तज्ज्ञ सांगतात. एकीकडे सीबीआयचे प्रश्न आणि साक्षीदारांच्या विधानांमध्ये विरोधाभास आहे, तर दुसरीकडे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरही वैद्यकीय तज्ज्ञांना आक्षेप आहे. प्रश्न अनेक आहेत, पण उत्तरं नाहीत, अशामध्ये सुशांतच्या मृत्यूचं सत्य बाहेर आणण्यासाठी पॉलीग्राफी टेस्ट हे सीबीआयसाठी महत्त्वपूर्ण साधन ठरणार आहे.