मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत बाथटाबमध्ये मृत्यू झाला. भारताच्या पहिल्या सुपरस्टारचा असा दुर्देवी अंत होणं तिच्या चाहत्यांसह बॉलिवूडच्या मनाला चटका लावणारं होत.
अभिनेत्री श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवीने 6 मार्च रोजी तिचा 21 वा वाढदिवस साजरा केला. श्रीदेवी भाच्याच्या लग्नासाठी दुबईत गेल्या होत्या. लग्नसोहळ्यानंतर काही वैयक्तिक कारणांसाठी त्या दुबईत थांबल्या होत्या.श्रीदेवींना जान्हवीचा वाढदिवस खास अंदाजात साजरा करायचा होता. त्याचं प्लॅनिंगदेखील करण्यात आलं होतं.
अकाली श्रीदेवींच्या जाण्याने कपूर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मात्र यामधूनही बोनी कपूर आणि त्यांच्या मुली खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. श्रीदेवीच्या इच्छेनुसार जान्हवीने ओल्ड एज होममध्ये तिचा वाढदिवस साजरा केला. सोबतच घरगुती सेलिब्रेशनही आयोजित करण्यात आले होते.
जान्हवीच्या वाढदिवसादिवशी तिच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. जान्हवीने शुभेच्छांचा स्वीकार करताना अक्षत रंजनला ILY असा रिल्पाय दिला. नकळत या रिल्पायमधून जान्हवीने तिच्या रिलेशनशिपबाबत संकेत दिल्याचे बोलले जात आहे.
अक्षतने जान्हवीसोबतचा एक जूना फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोसोबत त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.