Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा मोठा चाहता वर्ग आहे. देशभरात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. यासोबत प्रत्येक व्यक्तीला हा कार्यक्रम पाहता यावा यासाठी लाइव्ह शोजचं आयोजन देखील करण्यात येतं. अशातच आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या दौऱ्यामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला काही दिवस ब्रेक देण्यात आला होता. परंतु आता पुन्हा एकदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. नुकतीच प्राजक्ता माळीने याची घोषणा केली असून शूटिंगच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोनी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या पात्रांमधून मराठी कलाकार हे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. मात्र, काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातील कलाकार अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यामध्ये या कार्यक्रमाला ब्रेक देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम सुरु होणार असल्याची घोषणा प्राजक्ता माळीने केली आहे. ज्यामध्ये तिने इन्स्टाग्रामवर सेटवरील शूटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच सोनी मराठी वाहिनीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर प्रसारित केला होता. ज्यामध्ये या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी ही अभिनेत्री प्राजक्ता माळी सांभाळत आहे. सध्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
प्राजक्ताने शेअर केला व्हिडीओ
नुकताच अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर महाराष्ट्राची हास्यजत्रेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. ज्यामध्ये प्राजक्ताने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, We Are Back!. व्हिडीओमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार दिसत आहे. हा व्हिडीओ सेटवरील शूटिंगचा आहे. 2 डिसेंबरपासून हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आठवड्यातील तीन दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.