'पद्मावती'च्या वादावर काय म्हणतायत ममता बॅनर्जी, पाहा...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'पद्मावती' वादावर भाष्य केलंय. 

Updated: Nov 25, 2017, 06:00 PM IST
'पद्मावती'च्या वादावर काय म्हणतायत ममता बॅनर्जी, पाहा...  title=

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'पद्मावती' वादावर भाष्य केलंय. 

ममता बॅनर्जी यांनी 'पद्मावती'चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या टीमला राज्यात आमंत्रित करणार असल्याचं सांगितलंय. 

इतकंच नाही तर 'पद्मावती'च्या प्रीमिअरसाठी आणि प्रदर्शनासाठी विशेष बंदोबस्त करणार असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी आश्वासन दिलंय. 

यापूर्वी, बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर, सिनेमाचा हा वाद देशाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला नष्ट करण्याचा पूर्वनियोजित डाव असल्याचं म्हटलं होतं. 

भन्साळी इतर कोणत्याही राज्यात हा सिनेमा प्रदर्शित करू शकले नाहीत तरी आमच्या राज्याची दारं त्यांच्यासाठी सदैव खुली राहतील. या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी राज्यात विशेष बंदोबस्त करण्यात येईल, असं ममतांनी म्हटलंय. 

'पद्मावती' या सिनेमात दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.