खळबळजनक! नर्गिस फाखरीच्या बहिणीवर दुहेरी हत्याकांडाचा आरोप, EX बॉयफ्रेंडसह त्याच्या प्रेयसीला जिवंत जाळले

Nargis Fakhri Sister Aliya Fakhri: नर्गिस फखरीच्या बहिणीवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 3, 2024, 10:52 AM IST
खळबळजनक! नर्गिस फाखरीच्या बहिणीवर दुहेरी हत्याकांडाचा आरोप, EX बॉयफ्रेंडसह त्याच्या प्रेयसीला जिवंत जाळले title=
rockstar fame Nargis Fakhri sister aliya Fakhri Arrested In US For Killing Ex Boyfriend

Nargis Fakhri Sister Aliya Fakhri: रॉकस्टार चित्रपटात रणबीर कपूरची सहकलाकार नर्गिस फाखरीच्या बहिणीबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नरगिस फाखरीच्या बहिणीवर तिच्याच पूर्वाश्रमीच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे. रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्क पोलिसांनी नर्गिसची बहिण आलियाला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, नर्गिस फाखरीची बहिण फाखरीवर तिच्याच एक्स बॉयफ्रेंडसोबत पुन्हा नात्यात यायचं होतं. मात्र एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जॅकब्सने पुन्हा नातं ठेवण्यास नकार दिला. यावरुन चिडलेल्या आलियाने तिच्या एडवर्ड आणि त्याची प्रेयसी एटिएनची हत्या केली, असा आरोप आहे. आलियाने एडवर्डच्या घरातील गॅरेजला आग लावली. याच आगीत एडवर्ड आणि त्याच्या प्रेयसीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आलियाला ताब्यात घेतलं असून पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

क्वींस डिस्ट्रिक्टच्या अटॉर्नी मेलिंडा कॅट्जने एक प्रेस रिलीज जारी करत म्हटलं आहे की, आलिया फाखरीवर फर्स्ट डिग्री मर्डरच्या चार काउंट व्यतिरिक्त अन्य आरोप लावण्यात आले आहेत. तिच्यावर पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या घरातील गॅरेजला जाणूनबुझून आग लावल्याचा आरोप आहे. यात 35 वर्षीय एडवर्ड जॅकब्स आणि त्याची प्रेयसी अनास्तासिया एटिएनचा मृत्यू झाला. 

आलिया फाखरी सकाळी 6.20 च्या सुमारास जॅकबच्या दोन मजली घरी पोहोचली होती. त्यानंतर तिने तिथे आग लावून ओरडून म्हटलं की, तुम्ही आज सगळे मरणार आहात. आलियाने नंतर बिल्डिंगच्या गॅरेजमध्ये आल लावली. एटिएनने जेव्हा आगीचे लोळ पाहिले तेव्हा ती खाली गेली तिथे गॅरेजच्या दुसऱ्या मजल्यावर जॅकब झोपला होता. तिने त्याला वाचवायचा प्रय़त्न केला मात्र, आग इतकी वाढत गेली की दोघंही तिथे फसले आणि त्यांचा मृत्यू झाला. 

आलिया फाखरीला 26 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर पूर्वाश्रमीच्या प्रियकराची हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला. जर तिच्यावरील आरोप सिद्ध झाले तर तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. 

'माझी मुलगी निर्दोष'

नर्गिस आणि आलिया फाखरीची आईने न्यूयॉर्क डेली न्यूजला म्हटलं आहे की, मला नाही वाटत की या प्रकरणाशी माझ्या मुलीचे काही देण-घेणं आहे. ती कोण्याची हत्या करु शकत नाही. ती एक अशी व्यक्ती आहे ती सगळ्यांची काळजी घेते.