मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूरचे दोन मुलं तैमूर आणि जेह असे स्टारकिड्स आहेत जे वयाने जरी लहान असले तरिही नेहमी ते लाइमलाईटमध्ये असतात. तैमूर आणि जेह अली खान पापाराझींच्या कॅमेकडे पाहून कधी लाजतात तर कधी घाबरतात तर कधी ते फोटोसाठी पोजही देतात. मात्र यावेळी जेहला पापराजींसमोर त्याचे वडिल सैफ अली खानचा ओरडा खावा लागला.
सर्वांसमोर जेहवर भडकला सैफ
नुकतेच खान कुटूंब म्हणजेच सैफ अली खान करिना आणि तिचे दोन्ही मुलं न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी वेकेशनसाठी गेले होते. नुकतीचं खान कुटूंब त्यांच्या वेकेशन संपवून मुंबईत परतले आहेत. या संपुर्ण कुटूंबाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावेळी सैफ जेहवर खूप भडकला आणि यानंतर जेह कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडू लागला.
खरंतर जेहला कारच्या पुढच्या सीटवर बसायचं होतं मात्र त्याच्या आधीच तैमुर पुढच्या सीटवर जावून बसला आणि त्याने सीट अडवली जेहला त्याचा भाऊ तैमूरसोबत गाडीत पुढच्या सीटवर बासायचं होतं. त्यानंतर धाकटा मुलगा जेहही त्याच्या मोठ्या भावासोबत पुढच्या सीटवर बसण्याचा हट्ट करू लागला. अशा परिस्थितीत सैफ अली खानने जेहवर भडकला यानंतर सैफने जेहला समजवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर करीना त्याला घेऊन मागच्या सीटवर बसली.
पुढची सीट न मिळाल्याने ढसा-ढसा रडू लागला जेह
जेहला पुढची सीट न मिळाल्याने वडिल सैफ जेहला सगळ्यांसमोर ओरडू लागला. यानंतर वडिलांचा ओरडा खाल्यानंतर जेह ढसा-ढसा रडू लागला. या परिस्थितीत जेह पापाराझींच्या कॅमेरात कैद झाला. त्याच्या रडण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकं या व्हिडीओवर सध्या लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी करीना कपूर आणि सैफ अली खान त्याच्या कुटूंबासोबत स्विझरलँन्डला गेले होते. सध्या पिकनिकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
'लाल सिंह चड्ढा'च्या शूटिंग दरम्यान करीना कपूर खान गर्भवती होती, तिने 'जेह' हा देखील या चित्रपटाचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान हे कपल सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. करीना आणि सैफ यांची मुलं तैमूर आणि जेह या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात.