सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज करतेय लग्न? व्हिडीओमुळे खळबळ

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज पूर्णपणे कोलमडून गेल, आता ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण...  

Updated: Jan 24, 2022, 09:25 AM IST
सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज करतेय लग्न? व्हिडीओमुळे खळबळ title=

मुंबई :  अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या 40 व्य वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या अचानक जाण्यामुळे फक्त चाहत्यांना नाही तर समस्त कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर चाहत्यांना अभिनेत्री आणि त्याची गर्लफ्रेन्ड शेहनाज गिलची चिंता सतावत होती. शेहनाज देखील या दुःखातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान शेहनाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडीओमध्ये शेहनाज नव्या नवरीच्या रूपात दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद उठून दिसत आहे. शेहनाजला असं पाहून सिद्धार्थचे चाहते देखील प्रचंड आनंदी झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये शेहनाजने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे. सिद्धार्थच्या निधनानतंर लगेच शेहनाज लग्न करत आहे?  असं चाहत्यांना वाटत आहे. पण शेहनाज लग्न करत नसून सध्या व्हायरल होत असेलला व्हिडिओ फार जुना आहे.

या व्हिडीओचं चित्रीकरण एका फोटोशूट दरम्यान केलं होतं. व्हिडिओमध्ये शेहनाज वेग-वेगळ्या पोज देताना दिसत आहे. शेहनाजचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.