Papon: 13 वर्षांच्या मुलानं संपूर्ण रात्र हॉस्पिटलमध्ये घालवली, रूग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रसिद्ध गायकाची भावूक पोस्ट

Singer Papon Hospitalized: गायक पेपॉन यांनी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट (Papon Post) शेअर केली आहे ज्यात त्यांनी आपल्या मुलानं कशाप्रकारे आपण आजारी असताना संपुर्ण रात्र आपल्यासोबत घालवली याबद्दलची एक भावुक पोस्टही लिहिली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 14, 2023, 07:21 PM IST
Papon: 13 वर्षांच्या मुलानं संपूर्ण रात्र हॉस्पिटलमध्ये घालवली, रूग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रसिद्ध गायकाची भावूक पोस्ट title=

Singer Papon Hospitalized: वडिल आणि मुलाचे नाते हे जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी अनोखे आणि वेगळे असते. प्रत्येक वडिल हे आपल्या मुलासाठी खटपट हे करतच असतात. त्याचसोबत प्रत्येक मुलगाही त्यांच्या वडिलांची आपल्या परीनं प्रयत्न करताना दिसतो. त्यामुळे वडिल आणि मुलाचे नाते (Father Son Papon) हे त्यासाठीच प्रचंड वेगळे असते. आज मदर्स डे आहे आणि काही दिवसांनी आपण फादर्स डेही साजरा करणार आहोत तेव्हा याचवेळी एका लोकप्रिय गायकाची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे सगळीकडेच या पोस्टची चर्चा आहे. यावेळी पॅपोन (Papon) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्यात त्यांनी आपल्या एका फोटोसह आपल्या मुलाचाही फोटो शेअर केला आहे. यावेळी ते हॉस्पिटलमध्ये आडवे बेडवर पडले आहेत. त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय गायक पेपॉन यांना काही दिवसांपुर्वी (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) अचानक रूग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. (singer papon is hospitalized shares his and 13 year old son selfie from hospital with an emotional post)

त्यांना मुंबईच्या कोकिला धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांनी यावेळी आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहते त्यांना लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. 

काय लिहिली आहे पोस्ट? 

''आपण अशा अनेक लढाया एकट्यानं लढत असतो. खरंतर मला स्वत:ला हे सर्व सोशल मीडियावर पोस्ट करायला आवडत नाही परंतु काल रात्री जे घडले ते काहीतरी वेगळेच होते. मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि माझ्या 13 वर्षांच्या मुलानं रात्री माझ्यासोबत संपुर्ण वेळ थांबवण्याचा निर्णय केला. हा माझ्यासाठी खरंच खूप भावनिक क्षण आहे. हा क्षण मी माझ्या हितचिंतक आणि मित्रपरिवारासोबत शेअर करू इच्छितो. 

हेही वाचा - 'नागिन' फेम अभिनेत्री दिली गूड न्यूज! 'मदर्स डे'चे औचित्य साधून इन्टाग्रामवर शेअर केली गोड बातमी

मीही माझ्या आईवडिलांसाठी लहानपणी असंच करायचे जे मला आठवतेय. आज जर का ते येथे उपस्थित असते तर त्यांच्या नातवाला माझ्यासाठी हे सर्व करताना पाहून प्रचंड आनंद झाला असता. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी आता खूप बरा आहे.'' असं त्यांनी लिहिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे पेपॉन? 

पेपॉन यांचे खरे नावं हे अंगराग महंता असे आहे. त्यांनी आपले टोपणनाव म्हणून पेपॉन असे नावं ठेवले आहे. 2011 साली आलेल्या 'दम मारो दम' या चित्रपटातील त्यांची काही गाणी गाजली. त्याचसोबत 'बर्फी', 'सुलतान', 'हमारी अधुरी कहानी', 'दम लगा के हैशा', 'बजरंगी भाईजान' अश्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. ते कोक स्टुडिओतील गाण्यांसाठी ओळखले जातात.