Sushmita Sen Heart Attack : .मिस युनिव्हर्स, बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिला हार्ट अटॅक आल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. सुश्मितानं स्वत: तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिला दोन दिवसांपूर्वी हार्ट अटॅक माहिती दिली आहे. सुश्मिता हिनं म्हटलंय की, काहीच दिवसांपूर्वी तिला हार्ट अटक येऊन गेला. मात्र आता ती यातून सावरली आहे. दरम्यान तिच्यावर अँजिओप्लास्टी सर्जरीसुद्धा करण्यात आल्याचं या पोस्टमध्ये सांगितलंय. (Sushmita Sen Suffered Heart Attack )
सुष्मितानं सोशल मीडिया पेज इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती तिच्या वडिलांसोबत उभी आहे .आणि या फोटोखाली तिने पोस्ट लिहिली आहे, गेल्या काही दिवसात तिच्या आयुष्यात काय काय घडलयं, हे या पोस्टमध्ये तिने शेअर केलं आहे.
सुश्मिताने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, '' तुमचं हृदय नेहमी आनंदी ठेवा, तुमच्या चांगल्या वाईट कळत ते तुमच्यासोबत राहणार आहे, (हे बाबांचे शब्द आहेत )
मला गेल्या २ दिवसांपूर्वी हार्ट अटॅक (heartattack) येऊन गेला, अँजिओप्लास्टी करण्यात आहे. आता हृदय अगदी सुरक्षित आहे, आणि हो एका मोठ्या कार्डिओलॉजिस्टने हे सांगूनच टाकलाय की माझं मन माझं हृदय फार मोठं आहे. .ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे, सध्या सगळीकडे सुश्मिताच्या या पोस्टची खूप चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
आयपीएलचे (IPL) माजी अध्यक्ष ललित मोदी (Lali Modi) गेल्या वर्षी एका लव अफेअर चांगलेच चर्चेत आले होते. मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला डेट करत असल्याची माहिती त्यांनी इन्स्ट्राग्रामवर दिली होती. काही दिवसांनंतर त्यांच्या ब्रेकअपची चर्चा झाली.15 जुलै रोजी ललित मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर घोषणा केली की, ते आणि सुष्मिता एकमेकांना Dating करत आहेत. ललित यांच्या या घोषणेनंतर जणू एकच खळबळ उडाली होती. सुष्मिता सेनला सोशल मीडियावर प्रचंड troll करण्यात आलं आणि ललित मोदींची खिल्ली उडवण्यात आली. पण आता ललित आणि सुष्मिता यांच्यात काही सुरळीत होत नसल्याचं दिसून येत आहे. (lalit modi-sushmitasen affair)
बॉलिवूड मधील इतर कलाकारांनी सुश्मिता सेनला स्ट्रॉंग वुमन म्हणत तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत