मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री काजोलची बहिण तनीषा मुखर्जीने पायात जोडवी घालून फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामुळे तिने गुपचूप लग्न केलं का? असा प्रश्न विचारला जात होता. आता तनिषाने प्रेम आणि लग्नाबद्दल तिचं काय मत आहे.. हे स्पष्ट केलं आहे. तनीषाला कसा मुलगा हवायं एवढंच नाही तर तिने करियर बद्दल देखील अनेक खुलासे केले.
तनीषा मुखर्जीने अद्यापही लग्न केलेलं नाही. तनिषा म्हणाली, 'मला असं वाटतं प्रेम झाल्यानंतर सर्व काही रोमांचक असतं. पण मी अशा व्यक्तीच्या शोधात आहे, ज्याच्या सोबत नात्यातील प्रत्येक गोष्ट मी अनुभवू शकेल...'
अरमान कोहलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं टाळलं. शिवाय तनिषा म्हणाली कामाकडे मला लक्ष केंद्रीत करायचं आहे. असं देखील तनिषा म्हणाली.
तनिषा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहच्यांची संख्या देखील मोठा आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तनिषा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.