UPSC परीक्षा सोडून झाला अभिनेता! अपघात झाला, वजन वाढलं; आज सिंगल फादर म्हणून जगतोय आयुष्य

Chandrachur Singh: चंद्रचूड सिंग, एकेकाळी हा अभिनेता 90 चे दशक गाजवत होता. त्याकाळी सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, शाहरूख खान असे तगडे कलाकार आणि त्यांची स्पर्धा एकमेकांसोबत असताना या कलाकारानं आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. परंतु त्या एका अपघातानं त्याचे आयुष्यच बदलून टाकले.  

गायत्री हसबनीस | Updated: Jun 6, 2023, 06:16 PM IST
UPSC परीक्षा सोडून झाला अभिनेता! अपघात झाला, वजन वाढलं; आज सिंगल फादर म्हणून जगतोय आयुष्य title=
June 6, 2023: Where is maachis actor chandrachur singh who left upsc exams for becoming actor (Photo: Zee News)

Chandrachur Singh Now: बॉलिवूड कधी कोणाचं नशीब चमकतं तर कधी कोणाचं नशीब वेगळंच वळण घेत. कधीकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले कलाकार कधी त्यातून गुडूप होऊ जातात हेही कळत नाही. त्यामुळे नंतर या अभिनेत्यांचे, अभिनेत्रीचे काय होते हे कळतदेखील नाही. आपले आवडते कलाकार काय करतात याची त्यांना धड कल्पनाही नसते. 90 च्या काळात असे अनेक कलाकार आले आणि काळ गेला तसे वाऱ्याच्या वेगानं कुठे दिसेनासेच झाले. आता मात्र ओटीटीचे विश्व वाढल्यानं अशा कलाकारांना चांगली संधी प्राप्त झाली आहे त्यामुळे त्यांच्या चर्चाही वेगानं होताना दिसतात. या संधीचे ते सोनं करताना दिसत आहे, हेही वाखाण्याजोगे. असाच एक अभिनेता आहे ज्याची 90 च्या दशकात तूफान चर्चा होती. परंतु मध्यंतरी चित्रपटसृष्टीपासून दूर असलेला हा अभिनेता आता ओटीटीवरून आपलं नशीब आजमावतो आहे. 

आपण कायमच ऐकत असतो की अनेक कलाकार हे अभिनेता किंवा अभिनेत्री होण्यापुर्वी वेगळ्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावून असतात. कोणी सरकारी नोकरी करत असत, कुणी बॅंकेत तर कोणी चक्क इंजिनिअर अथवा डॉक्टर असतं परंतु यामुळे त्यांची ओळखच पुर्णत: बदलते. असाच एक अभिनेता होता ज्यानं UPSC ची परीक्षा सोडून चक्क मनोरंजन क्षेत्र निवडले आणि तो अभिनेता झाला. 90 च्या काळात जेव्हा अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, सलमान खान, सैफ अली खान, आमिर खान यांचे राज्य होते तेव्हा त्या काळात या अभिनेत्यानं आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्याचीही बरीच चर्चा रंगलेली होती. 

यूपीएससीची तयारी, मग अपघात अन्... 

माचिस, जोश यांसारख्या चित्रपटातून चंद्रचूड सिंग हा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर हा अभिनेता काही चित्रपटांमधून काम केल्यानंतर गायब झाला. 2000 साली त्याच्यासोबत एक अपघात झाला आणि मग त्याच्या आयुष्याचे चित्रचं पालटले. चंद्रचूड सिंगनं दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली मग इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. त्यानंतर त्याला आयएएस व्हायचं होतं. त्याच्या पालकांचीही हीच इच्छा होती. तेव्हा त्याला कळलं की अमिताभ बच्चन यांची प्रोडक्शन कंपनी ही नवे चेहरे शोधते आहे. मग तो ऑडिशनसाठी मुंबईला आला व त्याचे नशीब पालटले.

हेही वाचा - लग्नाआधीचं प्रेग्नंट झाल्याने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाली, ''मागासलेले विचार...''

1996 साली 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. चंद्रचूड याचे लग्न झाले त्यांना नंतर मुलगाही झाला परंतु नंतर चंद्रचूड यानं आपल्या मुलाला एकाट्यानं वाढविण्याची जबाबदारी घेतली. गोव्यात जेट स्कीइंग करताना त्याचा मोठा अपघात झाला. त्याच्या हाताला जबर दुखापत झाली आणि मग त्याचे करिअर हे धोक्यात आले. ट्रीटमेंट घेताना त्याचे वजनही प्रचंड वाढले होते. करिअरला ब्रेक घेतल्यानंतर त्यानं पुन्हा एकदा ओटीटीवर कमबॅक केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ओटीटीवर सक्रिय 

सध्या चंद्रचूड सिंग हा हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. परंतु सध्या तो ओटीटीवरून आपलं नशीब आजमावतो आहे. त्याची सुष्मिता सेनसोबतची आर्या ही वेबसिरिज तूफान गाजली होती. सोबतच नुकतीच त्याची कटपुतली ही वेबसिरिजही प्रदर्शित झाली आहे. त्यामुळे सध्या चंद्रचूड हा चर्चेत आला आहे.