Yeh Rishta Kya Kehlata Hai actress admitted: आजकाल अभिनेत्रींना आपल्या तब्येतीची (Celebrity Fitness) काळजी घेणं आवश्यक झालं आहे. रूटीन लाईफ तसेच कामाच्या दगदगीमुळे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य तऱ्हेचा व्यायाम आणि आहार कलाकारांसाठी (Celebs Excercise and diet) अवलंबवणे महत्त्वाचे झाले आहे. सेलिब्रेटी हे आपलं डाएट आणि एक्ससाईज फोलो करताना दिसतात परंतु जरा निष्काळजीपणाही शारिरीक समस्या वाढवू शकतो असंच काहीच एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या बाबतीत घडलं आहे. (actress admitted to hospital) तिला सलग तीन दिवस शारिरीक त्रास होत असल्यानं तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (yeh rishta kya kellata hai actress navika kotia admitted to hospital tarak mehta actress palak sidhwani meets her)
ये रिश्ता क्या केहलाता हैं (Yeh Rishta Kya Kehlata Hai) ही मालिका गेली बारा-तेरा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. आता याच मालिकेचा दुसरा सिझन (Season 2) सुरू झाला आहे. जो प्रेक्षकांना खूप आवडतो आहे. या मालिकेत कुणालच्या बहीणची भुमिका करणारी माया (Kunal's Sister Maya) म्हणजे अभिनेत्री नाविका कोटियासुद्धा (Actress Navika Kotia) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
आणखी वाचा - Juhi Chawla 'या' स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?
तिच्या भुमिकेचंही सर्वत्र कौतुक होतं आहे. परंतु नाविकानं नुकतीच आपल्या इन्टाग्राम हॅण्डलवरून एक स्टोरी (Navita Kotia Instagram Story) शेअर केली आहे जी पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
या स्टोरीमध्ये नाविकाची सिटी स्कॅन होतेय आणि हा फोटो शेअर करत तिनं आपल्या चाहत्यांना ती रूग्णालयातच एडमिट (Navika Kotia Admitted) असल्याचं कळवलं आहे. त्यासोबत इन्टाग्रामवर तिनं एक इमोशनल पोस्टही लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये ती म्हणते की, 'गेले 3 दिवस हे माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या थकवणारे होते. मी खूप कृतज्ञ आहे की माझ्या अवतीभोवती चांगली लोकं आहेत.'
आणखी वाचा - Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल
'माझे मित्र माझी काळजी घ्यायला आहेत. मी कोणाबद्दल बोलत आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे म्हणून मला कोणाला टॅग करण्याची गरज नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की, मला प्रत्येक लहान-मोठ्या कामात मदत केल्याबद्दल आणि माझ्यासोबत असल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.' अशी भावुक पोस्ट तिनं लिहिली आहे.
आपल्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तारक मेहता (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) या मालिकेत अभिनेत्री पलक सिंधवानी Palak Sidhwani) ही देखील तिच्या मैत्रीणाला म्हणजेच नविकाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली. सध्या नाविका हॉस्पिटलमध्ये उपचार घेते आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आहे.