Yeh Rishta Kya Kehlata Hai Off Air : छोट्या पडद्यावरील अनेक मालिका या गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या कार्यक्रमाने एका दशकाहून अधिक काळ गाजवला आहे. या मालिकेतून अनेक कलाकार हे प्रसिद्धीझोतात आले. 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका 2009 मध्ये सुरु झाली होती. गेल्या 15 वर्षांपासून सुरु असलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
स्टार प्लस वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' ही मालिका 2009 मध्ये प्रसारित करण्यात आली. ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. विशेष म्हणजे या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्डही मोडले होते. या मालिकेत आलेल्या अनेक ट्वीस्टमुळे ही मालिका चांगलीच रंगली होती. पण आता ही मालिका बंद होणार असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या निर्मात्यांना नोटीसही देण्यात आली आहे. यावर आता निर्मात्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
या मालिकेचे निर्माते रंजक शाही यांनी मालिका बंद होण्याबद्दल भाष्य केले आहे. 'बॉलिवूड लाईफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही मालिका माझ्यासाठी मला लहान बाळाप्रमाणे आहे. गेल्या काही वर्षांपासून मी मालिका टॉप 5 मध्ये आहे. या काळात आम्ही अनेक चढ-उतार पाहिले आहेत. कित्येकदा या मालिकेचा टीआरपी कमी झाला आहे. त्यामुळे आम्हाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. पण आता प्रोग्रामिंग टीमकडून मालिका बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. पण जेव्हा आम्हाला ही मालिका ऑफ एअर करण्याची नोटीस मिळाली, तेव्हा या मालिकेचा टीआरपी वाढला, असे निर्माते म्हणाले.
'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमुळे अनेक कलाकारांना ओळख देखील मिळवून दिली. या मालिकेमुळे हिना खान, करण मेहरा, शिवांगी जोशी आणि प्रणाली राठौर हे कलाकार लोकप्रिय झाले. ते सर्वजण प्रसिद्धीझोतात आले. 'ये रिश्ता क्या कहलाता' या मालिकेमुळे अनेकांच्या करिअरला कलाटणी मिळाली. या मालिकेमुळे अनेक कलाकार सिनेसृष्टीत चांगली प्रगती करत आहेत, असेही निर्मात्यांनी म्हटले.
दरम्यान आता ही मालिका कधी ऑफ एअर जाणार की नाही याबद्दल माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच ही मालिका ऑफ एअर झाली तर दुसरी कोणती नवी मालिका सुरु होणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.