Yo Yo Honey Singh एका विचित्र आजारातून सावरल्यानंतर जेव्हा सर्वांसमोर येतो...

त्यानं रॅप या क्षेत्राममध्येही आपलं नशीब आजमावण्यास सुरुवात केली.   

Updated: Mar 15, 2022, 12:20 PM IST
Yo Yo Honey Singh एका विचित्र आजारातून सावरल्यानंतर जेव्हा सर्वांसमोर येतो...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : भारतीय चित्रपटांमध्ये रॅप आणि हिप हॉप संगीताला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या Yo Yo Honey Singh यानं एक काळ गाजवला. म्हणजे तरुणाईवर त्याचीच जादू पाहायला मिळाली असं म्हणायला हरकत नाही. Yo Yo Honey Singh चा अंदाज आणि त्याची गाणी जशी आली तशीच ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. 

हृदेश सिंग अशी खरी ओळख असणाऱ्या हनी सिंग यानं ट्रिनिटी स्कूल युनायटेड किंग्डम मधून संगीताचं शिक्षण घेतलं. ज्यानंतर त्यानं रॅप या क्षेत्रामध्येही आपलं नशीब आजमावण्यास सुरुवात केली. 

प्रसिद्धीझोतात आलेला हा चेहरा एकाएकी कलाजगतापासून दुरावला गेला. काही वर्षांपूर्वीच तो व्यसनमुक्ती केंद्रात असल्याचीही माहिती समोर आली होती. 

अंमली पदार्थ आणि दारुच्या व्यसनाधीनतेमुळं यातून बाहेर येण्यासाठी त्यानं हा मार्ग निवडला होता. अतकंच नव्हे, तर जवळपास 18 महिन्यांसाठी त्यानं बायपोलर डिसऑर्डरचाही सामना केला. 

माझ्यावर औषधांचाही परिणाम होत नसल्याचं सांगताना विचित्र गोष्टींचा सामना करावा लागत असल्याचंही खुद्द हनी सिंगनं स्पष्ट केलं होतं. 

औषधांचाही त्याच्यावर काहीच परिणाम होत नसल्याचं पाहून त्याच्या संतापानं सर्व सीमा ओलांडल्या. अखेर एका टीमनं पुन्हा नव्यानं त्याच्या या आजारावर उपचार करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता त्यानं या आजाराला नमवलं. 

कलेच्या या दुनियेमध्ये हनी सिंग यानं मोठी लढाई दिली, पण त्याची ही लढाई स्वत:शीच होती... ज्यावर मात करत आज तो पुन्हा नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.