मुंबई : असं मानलं जातं की सेक्स जोडप्याला खूप आनंद देतो. मात्र काही जोडप्यांना वेदनादायक सेक्सचा अनुभव येतो. लुब्रिकेंटचा वापर केल्यानंतरही तुम्हाला लैंगिक संबंधांदरम्यान त्रास होतोय? यावेळी तुम्हाला प्रचंड वेदना, जळजळ यांचा त्रास होत असेल तर ही एक मोठी समस्या असू शकते. यामुळे जोडप्यांची लैंगिक इच्छा कमी होऊ शकते.
जर तुम्हाला लैंगिक संबंधांदरम्यान ही लक्षणं जाणवत असतील, तर तुम्हाला पेल्विक फ्लोअर मायल्जिया या समस्येने ग्रस्त असू शकता. ज्याला योनिस्मस असेही म्हणतात. वेदनादायक लैंगिक संबंधांचं हे एक सामान्य कारण असू शकतं. यामुळे पेल्विक फ्लोरचे स्नायू आखडले जाऊ शकतात.
योनीमार्गात प्रवेश करण्याचा प्रयत्नापर्यंत त्यांच्या पेल्विक फ्लोर स्नायूंची स्थिती स्पष्ट होत नाही. अशा परिस्थितीत स्नायू आकुंचन पावू शकतात किंवा घट्ट होऊ शकतात. ज्यामुळे योनी मार्गामध्ये वेदना होतात. लैंगिक संबंधांदरम्यान, टॅम्पोनच्या वापरावेळी तसंच मेस्ट्रुएशन कपचा वापर करताना हा अनुभव येऊ शकतो.
काही महिलांना असं वाटतं की, योनी मार्गाच्या आत एक भिंतीसारखी गोष्ट असून ती प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करते. कधीकधी लघवी आणि शौचास देखील हे प्रभावित होऊ शकतं.
ही नवीन समस्या समोर आली आहे. परंतु स्त्रियांमध्ये योनिस्मस प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 4 पैकी 1 महिला कारण काहीही असलं तरी वेदनादायक लैंगिक संबंध ठेवते. योनिस्मसचे अनेक प्रकार आहेत जे कोणत्याही वयोगातील महिलांना प्रभावित करू शकतात.