मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या वेरिएंटसमुळे अनेक देशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे काही देशांनी कोविड लसीच्या तिसऱ्या म्हणजेच बूस्टर डोसला मंजुरी देण्यास दिलीये. मात्र भारतात या संदर्भात अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पुण्याचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी म्हटलंय की, कोविड -19 लसीचा तिसरा डोस 6 महिन्यांनी घ्यावा.
पुनावाला यांच्या म्हणण्याप्रमाणे, लसीच्या 2 डोसांमधील अंतर 2 महिने असावं. द लॅन्सेट मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असं म्हटलंय की, काही काळानंतर कोविड विरुद्ध कोविडशिल्डच्या अँटीबॉडीज कमी होतात. पूनावाला याबाबतम्हणाले, 'हे खरे आहे, पण मेमोरी सेल्स कायम राहतात.'
Covishield ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने SII द्वारे निर्मित ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका लसीची आवृत्ती आहे. तसंच, भारत सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेल्या पहिल्या दोन लसींपैकी एक कोविशील्ड आहे.
सायरस पूनावाला पुढे म्हणाले, '6 महिन्यांनंतर अँटीबबॉडीज कमी होतात, म्हणून मी तिसरा डोस घेतला आहे. आम्ही आमच्या सुमारे 8 हजार कर्मचाऱ्यांना तिसरा डोस देखील दिला आहे. लसीची कमतरता होती, म्हणून मोदी सरकारने लसीतील अंतर 3 महिन्यांपर्यंत वाढवलं. परंतु 2 डोसांदरम्यान 2 महिन्यांचा अंतर असलं पाहिजे.
लॉकडाऊनसंदर्भात, पूनावाला म्हणाले की, कोरोनाला लढा देण्यासाठी हा प्रभावी मार्ग नाही. ते म्हणाले, "जर लॉकडाऊन नसेल तर सुरुवातीला संसर्ग पसरेल परंतु नंतर हर्ड इम्युनिटी वाढेल. मी हर्ड इम्युनिटीला प्राधान्य देतोय कारण त्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यूचं प्रमाण आहे.