बाजरीची भाकरी खाता पण कधी उकडलेली बाजरी खाल्ली आहेत का? 11 आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल अवाक

Bajra Health Benefits : हिवाळ्यात बाजरी भाकरी खावी असे आहार तज्ज्ञ सांगतात. पण तुम्ही कधी उकडलेली बाजरी खाल्ली आहे का? उकडलेली बाजरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून अवाक् व्हाल. 

नेहा चौधरी | Updated: Jan 7, 2025, 08:35 PM IST
बाजरीची भाकरी खातो पण कधी उकडलेली बाजरी खाल्ली आहेत का? 11 आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल अवाक्  title=

Bajra Health Benefits : निरोगी राहण्यासाठी व्यायामासोबतच आहारा अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. आहारात तुम्ही काय खाता, त्याच प्रमाण काय आहे, किती वाजता खाता यावर तुमचं आरोग्य चांगली किंवा वाईट ठरतं. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, सगळे फळं, भाज्या आणि भाजीपाला खालला पाहिजे. हिवाळ्यात बाजरी, ज्वारी, नाचणी ही आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक मानली जाते. पोषक तत्वांनी युक्त बाजरीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानलं गेलंय. फायबर, जीवनसत्त्वे, प्रथिने, बाजरी यासह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध अशा अनेक प्रकारे आहारात समाविष्ट केलं पाहिजे. बाजरीचे सेवन केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. लोकांना बाजरीचे लाडू, बाजरीची भाकरी आणि बाजरीची लापशी खायला आवडते. पण उकडलेली बाजरी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असून तुम्हाला त्याचे 11 आरोग्यदायी फायदे समजल्यास फायदेशीर होईल. 

उकडलेली बाजरी खाण्याचे फायदे 

1. उकडलेली बाजरी विविध पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. याचं सेवन केल्याने शरीराला प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आपल्याला मिळतात. 

2. उकडलेली बाजरी हा ऊर्जेचा चांगला स्रोत असून जो दिवसभराचा थकवा दूर करण्यास मदत करतो. 

3. आजकाल अनेकांना ग्लुटेनची ॲलर्जी असते, त्यांच्यासाठीही उकडलेली बाजरी फायदेशीर मानली जाते. कारण बाजरी ग्लूटेन मुक्त असते. 

4. बाजरीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. 

5. बाजरीत व्हिटॅमिन बी, आयर्न आणि फोलेट यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात.

6. जे लोक लठ्ठ आहेत किंवा वजन नियंत्रण ज्यांना करायचं आहे, त्यांच्यासाठी उकडलेली बाजरी देखील फायदेशीर आहे. उकडलेल्या बाजरीमध्ये भरपूर फायबर असतं, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर पोट बराच काळ भरलेले राहतं.

7. उकडलेली बाजरी मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. बाजरीच्या सेवनाने इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 

8. उकडलेल्या बाजरीचे सेवन हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी देखील फायदेशीर मानली गेलीय. 

9. उकडलेल्या बाजरीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि अपचन कमी होतं. 

10. बाजरीमध्ये असलेले पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करू शकतात. त्यामुळे आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते. 

11. उकडलेल्या बाजरीमध्ये असलेले लोह अशक्तपणा कमी करण्यास मदत करतं आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास फायदेशीर ठरतं. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)