Crack Heels : पायांना भेगा का जातात? थंडीमुळे… छे! पाहा यामागचं खरं कारण

तुम्हीही पायाला पडणाऱ्या भेगांमुळे त्रस्त आहात का? उपाय करुन थकण्यापेक्षा त्यामागचं कारण जाणून घ्या आणि योग्य उपचार पद्धतींचा अवलंब करा

Updated: Oct 24, 2022, 01:22 PM IST
Crack Heels : पायांना भेगा का जातात? थंडीमुळे… छे! पाहा यामागचं खरं कारण  title=
Crack Heels causes and remedies

Crack Heels : बदलत्या ऋतुचक्राचा (Climate change) सर्वांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. कितीही म्हटलं तरीही बदलणारा ऋतू सोबत आजारपणही घेऊन येतो. सध्या याच बदलाला सर्वजण सामोरे जात आहेत. कारण, भारतात हल्ली ऋतूचक्र इतकं बिघडलं आहे, की कधी उन्हाळा, कधी पावसाळा, कधी अचानकच थंडी... काही थांगपत्ता नाही. या बदलत्या हवामानामुळं अनेकांनाच विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. पायांना भेगा पडणं ही त्यापैकीच एक समस्या. बऱ्याचदा थंडीच्या दिवसांमध्ये पायांना भेगा जातात अशा तक्रारी अनेकजण करतात. पण, खरंच त्यामागे हेच कारण आहे का?

सर्वांच्याच पायांना थंडीमुळे भेगा पडतात असं नाही. अनेकदा हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि शरीरात Vitamins ची कमतरता हीसुद्धा यामागची कारणं असू शकतात. फरक फक्त इतकात की, थंडीच्या दिवसांत ही समस्या आणखी बळावते.

अधिक वाचा : तुमची मुलंही चिखल, मातीत खेळतात? आताच वाचा ही महत्त्वपूर्ण बातमी

हिवाळ्यामध्ये (Winter) आपण शरीर गरम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. लोकरी कपडेही घालतो. पण, या साऱ्यामध्ये पायांकडे मात्र दुर्लक्ष होतं. हिवाळ्यातली कोरडी हवा त्वचा आणि तळव्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता शोषून घेते. ज्यामुळं पायांवर असणारी Dead Skin रुक्ष होऊन फाटू लागते.

वर्षभर पायांना भेगा असतात?

थंडीमध्ये पायांना भेगा जातात असं म्हणणाऱ्यांसोबतच आमच्या पायांना वर्षभर भेगा असतात असं म्हणणारेही कमी नाहीत. वर्षभर हा त्रास असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात काही पोषक घटकांचा अभाव असतो. यामध्ये (Viramin b3) व्हिटॅमिन बी3, ई आणि सी यांचा समावेश आहे. ज्यांच्या अभावी त्वचा रुक्ष आणि निर्जीव दिसू लागते.

यावर तोडगा काय?

  • पूर्ण वर्षभर पायांना भेगा असतील तर आठवड्याभरातून किमान एक दिवस ते 25 मिनिटं उकळलेल्या पाण्यात पाय ठेवा. यानंतर पायांना स्क्रब करुन मॉईश्चरायझर लावा.
  • डाएटमध्ये  (Diet) व्हिटॅमिनची कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न करा आणि सुकामेवा खा.
  • रोज अंघोळ करताना पायांच्या भेगा स्वच्छ करा, जेणेकरुन त्यामध्ये धूळ माती साठणार नाही.
  • व्हिटॅमिन ई कॅप्स्सुलमधील तेल काढून ते दिवसातून किमान दोनदा भेगांवर लावा. काही वेळ मसाज करा. यामुळे फायदा होईल.
  • तिळाचं तेल हलकं गरम करुन भेगांवर चोळा. असं केल्यास पायांना भेगा जाण्याचं प्रमाण कमी होईल.