दही योग्य की ताक? पाहा कुणी करावे दह्याचे आणि ताकाचे सेवन...

Curd vs Buttermilk:  अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की दह्याचे सेवन करावे की ताकाचे. अनेकदा आपल्याला याबाबत गोंधळ उडतो. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की दह्याचे आणि ताकाचे आपल्याला कोणते फायदे होतात. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 10, 2023, 02:34 PM IST
दही योग्य की ताक? पाहा कुणी करावे दह्याचे आणि ताकाचे सेवन...  title=
dahi vs chaas what is better for health latest health news in marathi

Curd vs Buttermilk: आपल्या आहारात आपण योग्य त्या गोष्टींचा समावेश करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु आपलं खाणं हे अनेकदा जंक फूडचं असतं. अनेकदा आपल्याला अशा फूडमुळे फार त्रास होऊ शकतो. आपल्याला अपचनाचा त्रास होण्याचीही शक्यता असते. तेव्हा अशावेळी हा त्रास कमी व्हावा म्हणून आपण रात्री जेवणानंतर ताक किंवा दही खातो. त्यामुळे आपल्या पोटाला रात्रभर आराम मिळतो. अशाच आता चर्चा आहे की आपल्या आहारात दह्याचा समावेश करावा की ताकाचा? त्यामुळे या प्रश्नानं आपल्या सगळ्यांनाच भांडावून सोडलेलं असतं. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की नक्की या आपण जेवणात कशाचा समावेश करून घ्यायला हवा आहे. आपल्यासाठी नक्की काय योग्य आहे. अनेकांना दही जास्त आवडते त्यामुळे ते सतत दही खाण्याचा सपाटा लावतात. तर काही जण ताक पितात. परंतु ताक, दही याचे कुणी सेवन करावे आणि कुणी करू नये हे आपण या लेखातून जाणून घेणार आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, तज्ञ सांगतात की, ताक हे हलके असते तर दही हे जड असते. त्यातून ताकाचा वापर आपण वजन कमी करण्यासाठी करू शकतो. तर दही हे आपलं वजन वाढवू शकते. त्यातून दही हे गरम असते व ताक हे त्यामानानं थंड असते. @eterny_ayurveda या इन्टाग्राम पेजवरून डॉ. चैताली राठोड यांनी हा फरक समजावून सांगितला आहे. त्यामुळे जर का तुमच्या शरीरात उष्णतेची कमी असले तर तुम्ही ताकापेक्षा दही घ्यावे आणि जर का तुमच्या शरीरात उष्णता जास्त असेल तर तुम्ही ती कमी करण्यासाठी तुम्ही ताक पिऊ शकता. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जर का वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ताक पिऊ शकता अन्यथा दही तुमच्यासाठी योग्य आहे. येथे तुम्ही वैद्यकीय सल्ला घेतलेला बरा ठरेल. 

हेही वाचा : जपानच्या पंतप्रधानांच्या पत्नी युको किशिदा यांनी परिधान केली कांजिवरम साडी

काय आहेत ताकाचे फायदे? 

  • ताक प्यायल्यानं आपल्याला आपले पचन नीट होण्यास मदत आहेत. त्यातून रात्री जेवण झाल्यावर ताक पिणं ही सवय आपल्या सर्वांनाच आहे. त्यामुळे ताक प्यायल्यानं आपल्याला त्याचा फायदा होतो. 
  • सोबतच ताक हे आपल्या शरीरासाठी थंड आणि आरामदायी असते. त्यामुळे त्याचा फायदा हा आपल्या शरीराला चांगलाच होतो. 
  • ताकानं आपल्याला वजन कमी करण्यासही मदत होते. 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काय आहेत दह्याचे फायदे? 

  • दही देखील वजन कमी करण्यास मदत करते तर रोज दही खाण्याचेही आपल्याला अनेक फायदे मिळत असतात. 
  • दही खाल्ल्यानं आपल्याला शरीरातील व्हिटॅमिन बीचीही कमतरता कमी होते.
  • त्याचसोबत दह्यानं इम्यूनिटीही वाढते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)