Health Tips : आज प्रत्येक जण आपल्या आरोग्याबद्दल जागृत झालेले आहेत. असंख्य लोक जीम, योगा यावर भर देतात. डॉक्टरही सांगतात बदलेल्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे. बैठे काम वाढल्यामुळे दररोज किमान तासभर चालावे असं डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ सांगतात. पण काही तज्ज्ञ हे पायऱ्या चढण्याचाही सल्ला देतात. मग वजन कमी करण्यासाठी वॉकिंग की पायऱ्या चढणं नेमकं कुठला व्यायाम आपल्यासाठी योग्य आहे, याबद्दल अनेक जण संभ्रमात असतात. तुमच्या याच प्रश्नाचं निरासन आज आम्ही करणार आहोत. व्यायाम तज्ज्ञ अशोक पत्की यांनी वजन कमी करण्यासाठी वॉकिंग की पायऱ्या चढणं यापैकी कोणती एक्सरसाइज सर्वात्तम आहे याबद्दल सांगितलंय. (Walking or climbing stairs which exercise is best for weight loss)
पायऱ्या चढण्यामुळे तुमच्या पायाचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. त्याशिवाय ग्लूट्स आणि कोर स्नायू मजूबत होतात. स्नायू बळकट झाल्यामुळे बेसल चयापचय दर वाढण्यास फायदा मिळतो. साध्या शब्दात सांगायचं तर तुम्ही विश्रांती करत असाल तर त्यावेळीही तुमची कॅलरी बर्न होतात.
वॉकिंगपेक्षा पायऱ्या चढताना तुमच्या लक्षात आलं असेल यावेळी तुमच्या हृदय गतीने वाढतं. अशात पायऱ्या चढताना कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. एका अभ्यासानुसार एकाच वेळी पायऱ्या चढून तुम्ही चालण्यापेक्षा सुमारे 30% जास्त कॅलरीज बर्न करतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी वेळात जास्त कॅलरीच बर्न होतात. वॉकिंग करुन कॅलरीच बर्न करण्यासाठी तुम्हाला एक तास चालवे लागते. तेच पायऱ्या चढून कॅलरी बॅर्न करण्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास पुरेसा आहे. शिवाय वॉकिंगसाठी तुम्ही आपल्या दररोजच्या वेळातून वेगळा वेळ काढवा लागतो. पण ऑफिस किंवा बिल्डिंगमध्ये लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर केल्यास तुमचा व्यायाम होतो. त्याचा अर्थ तुमच्या वेळीची बचत होते.
पायऱ्याचढण्याचा फायदा तुम्हाला लक्षात आल्यानंतर याचा दुप्पटीने फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही वेगाने पायऱ्या चढू शकता. त्याशिवाय एकाच वेळी दोन पायऱ्या चढल्यानेही तुम्हाला फायदा होतो.
तज्ज्ञ सांगतात की, पायऱ्या चढण्याचा व्यायाम हे प्रत्येकासाठी उपयुक्त नाही. ज्या लोकांना गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल त्यांनी पायऱ्या चढण्याचा व्यायाम करु नयेत. या लोकांनी चालण्याचा व्यायाम करावा.
पायऱ्या चढणे आणि चालणे हे दोन्ही वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम मानला गेला आहे. तुमच्या प्रकृती आणि शारीरिक क्षमतेनुसार या दोन्ही व्यायामांचा तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये त्याचा समावेश करावा. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हेच वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)